बिहार : वादळी पावसाने ऊस पिकाचे मोठे नुकसान

बेगूसराय : मंझौल उपविभागात झालेल्या वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. मंझौल परिसरात रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसाने पिकांसह झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोसळलेल्या या पावसाचा पिकांना चांगलाच फायदा होणार आहे. मात्र वादळी वाऱ्यासह कोसळलेला पाऊस उभ्या शेतातील पिकांसाठी शाप ठरल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मंझौल येथील शेतकऱ्यांनी सांगितले की, ऊस, मक्का आणि जनावरांसाठी उपयुक्त ठरणारे गवत या वादळी पावसाने भुईसपाट झाले. याशिवाय वादळामुळे अनेक ठिकाणी ऊस पिक, झाडे उन्मळून पडली. पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here