पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.एम. रासकर यांना त्यांच्या साखर उद्योगामधील अतुलनीय योगदानाबद्दल नवी दिल्ली येथील दि शुगर टेक्नोलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया (STAI) कडून २०२३ मधील ‘जीवन गौरव पुरस्कार’ (Life Time Achievement Award) देऊन गौरविण्यात आले. दि. ६ सप्टेंबर २०२३ रोजी तिरुवनंतपूरम (केरळ) येथे त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक पांडुरंग राऊत, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. कारखान्याचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक पांडुरंग राऊत हे गेल्या चार दशकांपासून सामाजिक व औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहेत. या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी भरीव योगदान दिले आहे. राहू (दौंड) जवळ त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांना सोबत घेऊन श्रीनाथ म्हस्कोबा हा खासगी साखर कारखाना २००४ साली सुरू केला. कमी खर्चात, उत्तमपणे कारखाना कसा चालवता येतो याचा आदर्श त्यांनी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यांच्या माध्यमातून उभा केला आहे. रासकर यांनी साखर उद्योगाच्या विकासासाठी दिलेल्या योगदान दखल जीवन गौरव पुरस्काराच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे.