बिहार : खराब रस्त्यांमुळे ऊस हंगामात शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार

बगहा : आगामी दोन महिन्यात स्थानिक तिरुपती चरनी साखर कारखान्याचा ऊस गाळप हंगाम सुरू होईल. मात्र कारखान्याला जोडणाऱ्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी जर शहरात पर्यायी रस्त्यांची व्यवस्था झाली नाही तर शहरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्याचा सर्वात जास्त फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे.

शहरात आरओबीच्या बांधकामामुळे रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. अशा स्थितीत गळीत हंगामापूर्वी ऊस पुरवठा करण्यासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था न केल्यास शेतकरी तसेच कारखाना व्यवस्थापनाला त्याचा फटका बसणार आहे. कारखान्याला ऊस पुरवठा करताना शेतकऱ्यांना अडचणी आल्यास ऊस तोडणीवरही परिणाम होणार आहे. एवढेच नव्हे तर वाहतूककोंडीत शेतकऱ्यांना दिवसभर रस्त्याकडेला ऊसाची वाहने थांबवून त्याची राखण करत बसावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here