अवघ्या नऊ महिन्यांमध्ये उभारला एनव्हीपी साखर कारखाना

धाराशिव : धाराशिव तालुक्यातील जागजी येथे अवघ्या नऊ महिन्यांमध्ये उभारला एनव्हीपी साखर कारखाना उभारण्यात आला आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या एनव्हीपी शुगरतर्फे आज (दि.८) बॉयलर अग्रीप्रदीपन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अवघ्या नऊ महिन्यांमध्ये गाळपासाठी सज्ज झालेल्या एनव्हीपी शुगरचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा ज्ञानसिंधू संदिपान महाराज हासेगावकर, खा. ओमराजे निबाळकर, जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे, साई संस्थानचे रितेश रामदासी यांच्या शुभ हस्ते शुक्रवारी सकाळी दहा वाजता होणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, जिपचे माजी उपाध्यक्ष केशव पाटील, हिम्मतराव पाटील, पवनराजे मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश राजेनिंबाळकर, सीए सचिन शिंदे, कुलदीप पाटील- विटेकर आदी उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here