नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लि., युनिट क्र. १. (लक्ष्मी नगर ता. अर्धापूर जि. नांदेड) येथे ऊस पिक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ऊस लागवड व्यवस्थापन व खोडवा व्यवस्थापन’ या विषयावर ऊस पिक परिसंवाद आयोजित केला आहे.
हा परिसंवाद कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव शामराव विडके, उपाध्यक्ष नरेंद्र भगवानराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. या कार्यक्रमास डॉ. रमेश हापसे, (प्रधान शास्त्रज्ञ व प्रमुख, ऊस -प्रजनन विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे), डॉ. अंकुश चोरमुळे (ऊस रोपे लागवड तज्ञ, संस्थापक गन्नामास्टर अँग्रो प्रा. लि., सांगली), सुरेश माने (मा. शाखज्ञ व आधुनिक ऊस लागवड तंत्रज्ञान) वसंतदादा शुगर इन्स्टीटयूट पुणे) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
रविवार, दि. १० सप्टेंबर २०२३ स्थळ : श्री कालेजीदेवी मंदिर, (रणछोडदास मंगल कार्यालय, मुदखेड ता. मुदखेड जि. नांदेड) येथे सकाळी १०.०० वाजता, तर दुपारी तीन वाजता (अपरंपार मठ मालेगाव. ता. अर्धापूर जि. नांदेड) येथे होणार आहे. तरी तरी कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी ऊस पिक परिसंवादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यंकटराव बाबाराव कल्याणकर (अध्यक्ष, शेती समिती व समस्त संचालक मंडळ) यांनी केले आहे.