सार्वजनिक बांधकाम विभाग करणार ऊस विभागासाठी रस्ते निर्मिती

मुझफ्फरनगर : सार्वजनिक बांधकाम विभाग यंदा जिल्ह्यातील ऊस विभागाचे रस्ते बांधणार आहे. रस्त्यांचा प्रस्ताव सादर झाल्यानंतर सरकार त्याचे पैसे देणार आहे. जिल्ह्यात ऊस विभागाचे ५३४ छोटे रस्ते आहेत. ऊस शेतीसाठी त्यांचा वापर केला जातो. यापैकी ज्या रस्त्यांवर जास्त खड्डे आहेत आणि ते पूर्णपणे खराब झाले आहेत, ते आधी नव्याने बांधले जातील. ऊस भाग प्रस्ताव आणि अंदाजपत्रक तयार करण्यात व्यस्त आहे. जिल्ह्याला यासाठी १५ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेतातून साखर कारखान्याकडे जाणारे रस्ते तयार केले जात आहेत. जिल्ह्यात आठ साखर कारखाने आहेत. त्यांच्यासाठी ऊस विभागाने आता जिल्ह्यात ५३४ रस्ते बांधले आहेत. ऊस विकास विभागात एई आणि जेई स्वतंत्रपणे तैनात आहेत. पीडब्ल्यूडी राज्यात २५० कोटी रुपये खर्च करून ऊस विभागाचे रस्ते बांधणार आहे. राज्यातील ४२ जिल्ह्यांमध्ये ऊसाचे उत्पादन घेतले जाते. त्यापैकी १० जिल्ह्यांत ऊस पिक सर्वाधिक घेतले जाते. यात मुझफ्फरनगरचाही समावेश आहे.

जिल्हा ऊस अधिकारी संजय सिसोदिया यांनी सांगितले की, ऊस विभागाने रस्त्यांची यादी पीडब्ल्यूडीकडे सुपूर्द केली आहे. तर पीडब्ल्यूडीचे जेई प्रेमचंद यांनी ऊस विभागाकडून खराब झालेल्या रस्त्यांची यादी मिळाली आहे. या रस्त्यांची पडताळणी केली जात आहे, असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here