बलरामपूर : येथील बलरामपूर सहकारी ऊस विकास संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले. सभेत प्रमुख पाहुणे म्हणून माजी ऊस अध्यक्ष रणवीर सिंग तर विशेष अतिथी म्हणून जिल्हा ऊस अधिकारी आर. के. कुशवाह उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ ऊस विकास निरीक्षक तथा विशेष सचिव अविनाश सिंह होते.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, रणवीर सिंह यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न वेळेत सोडवणे हा समितीचा मुख्य उद्देश आहे. जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना तोडणी पावती संदर्भातील समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले. विशेष सचिव ऊस अविनाश सिंह यांनी मॉडेल ऊस वितरण प्रक्रिया आणि ऊस हंगामाच्या वेळापत्रकावर चर्चा केली. बैठकीत विविध ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
बैठकीत शेतकऱ्यांच्या ऊस सर्वेक्षण नोंदणीशी संबंधित समस्यांचे निराकरण करताना सर्व प्रतिनिधींना आपल्या नोंदीचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले. गळीत हंगामात ऊस पुरवठा करताना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही याची दक्षता घेण्याचे ठरले. शेतकऱ्यांनी प्रगत जातीच्या ऊसाची लागवड करण्याचे आवाहन जिल्हा ऊस अधिकारी आर. के. कुशवाह यांनी केले. यावेळी माजी अध्यक्ष आनंद सिंग, राहुल मणी तिवारी, रामानंद पांडे, चंद्रभान पांडे, द्वारिका प्रसाद आदी उपस्थित होते.