बिहार : ऊस उत्पादनवाढीसाठी शेतकरी प्रशिक्षण अभियानाला जोर

बैकुंठपूर : जिल्ह्यात उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. सिधवालियाच्या भारत शुगर मिल्सच्यावतीने सीएसआर योजनेंतर्गत समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपूर येथील साखर कारखान्यात प्रशिक्षण घेण्यासाठी जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांचे गट पाठविण्यात येत आहेत. शेतकरी तेथे पोहोचून शास्त्रोक्त पद्धतीने ऊस उत्पादन वाढविण्याचे तंत्र शिकत आहेत.

लाईव्ह बिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, प्रगतशील शेती करणाऱ्यांशी चर्चा करणे आणि आपले ऊस उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न करणे असा या अभियानाचा हेतू आहे. शेतकऱ्यांनी उसामध्ये आंतरपीक घेऊन अतिरिक्त नफा मिळवावा असा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक शशी केडिया यांनी सांगितले. तर ऊस विभागाचे उपाध्यक्ष आर. के. सिंग म्हणाले की, शरद ऋतूमध्ये अधिक क्षेत्रावर उसाची पेरणी करून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात ऊस तोडणी, गाळप करून अधिक नफा मिळवावा.

कारखान्याचे सहाय्यक सरव्यवस्थापक आशिष खन्ना यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अभियानाअंतर्गत साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील प्रगतीशील शेतकऱ्यांची निवड करून त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण घेणारे शेतकरी आपापल्या भागात येवून इतरांना ही माहिती, प्रशिक्षण देतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here