नवी दिल्ली : सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये सकारात्मक कल दिसून आला. त्यामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचा ९ पैशांच्या वाढीसह ८२.९३ च्या पातळीवर व्यवहार सुरू झाला. भारतीय शेअर बाजारातील वाढ आणि डॉलर कमजोर होणे यामुळे रुपया वधारला. फॉरेक्स ट्रेडर्सच्या म्हणण्यानुसार कच्चे तेल ९० डॉलरच्या वर राहिल्यामुळे आणि परदेशी गुंतवणुकदारांनी विक्री केल्यामुळे भारतीय चलनात वाढ होत आहे.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, इंटरबँक फॉरेन एक्स्चेंजकडील आकडेवारीत दिसून येते की, डॉलरच्या तुलनेत रुपया ९ पैशांनी वाढून ८२.९३ वर खुला झाला. या काळात रुपयाने ८२.९० चा निच्चांक आणि ८२.९६ चा नीचांक गाठला. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ८३.०२ वर बंद झाला होता. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विश्लेषक गौरांग सोमय्या म्हणाले की या आठवड्यात देशांतर्गत चलनवाढीच्या आकड्यांवर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ८२.८० ते ८३.४० च्या रेंजमध्ये राहू शकतो. त्यामुळे चलन अस्थिरता होऊ शकते.
जगातील सहा चलनांच्या तुलनेत डॉलरची मजबुती दर्शविणारा डॉलर निर्देशांक कमजोर दिसत असून तो ०.३५ टक्क्यांनी घसरून १०४.७२ वर आला. ब्रेंट क्रूड ०.२४ टक्क्यांनी घसरून ९०.४२ डॉलर प्रती बॅरल आहे.