आता शेणापासून बनवलेल्या कुंड्यांमध्ये उसाची रोपे तयार केली जाणार आहेत. ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्या शेतात याची थेट लागवड करू शकतील. त्याच्या साहाय्याने उसाचे बियाणे तयार केल्यास प्लास्टिक कप हद्दपार करता येतील. बारखेडा जिल्ह्यातील बजाज हिंदुस्थान लिमिटेड साखर कारखान्याने एक लाख शेणखताच्या कुंड्या खरेदी करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, महिला बचत गटांच्या माध्यमातून ऊस विभागात रोपवाटिका तयार केली जात असून, त्याठिकाणी उसाचे बियाणे तयार केले जाते. ऊस उत्पादक शेतकरी या रोपवाटिकांमधून ठराविक दराने उसाचे बियाणे खरेदी करून त्याची लागवड करीत आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या पुढाकारामुळे आता शेणापासून बनवलेल्या कुंड्यांमध्ये उसाचे बियाणे तयार केले जाणार आहे. यातून प्लास्टिक कप हद्दपार केले जातील.
यासाठी बजाज हिंदुस्थान लिमिटेड बारखेडाने शेणखताच्या एक लाख कुंड्या खरेदी केल्या आहेत. देवीपुरा महिला बचत गट फुलांच्या कुंड्या तयार करण्याचे काम करत आहे. बारखेडा साखर कारखान्याने शेणखताची एक लाख कुंड्या खरेदी केल्याचे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद कुमार यांनी सांगितले. हे बी थेट शेतात पेरता येते. त्यामुळे प्लास्टिक कपचा वापर टाळता येईल. शेणाच्या दहा हजार अगरबत्ती विकल्या गेल्याचे त्यांनी सांगितले. सीडीओ धर्मेंद्र प्रताप सिंह म्हणाले की, शेणखताची भांडी इतर साखर कारखान्यांमध्ये वापरण्यास प्रोत्साहन दिले जाईल.