थकीत ऊस बिले मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय

हापूड : भाकियूच्या टिकेत गटाचे कार्यकर्ते, शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर चौथ्या दिवशीही आंदोलन सुरूच राहिले. शेतकर्‍यांचे प्रश्‍न सुटल्यानंतर, शेतकर्‍यांच्या उसाची थकीत बिले मिळाल्यानंतरच कार्यकर्ते आंदोलन मागे घेतील असा निर्णय घेण्यात आले. सुरेंद्रसिंग बाना, प्रदीप चौधरी आदींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरू ठेवले आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भाकियू टिकैत गटाचे जिल्हाध्यक्ष दिनेश खेडा म्हणाले की, जिल्ह्यातील दोन्ही साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची उसाची थकबाकी आहे. इतर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाचे पैसे वेळेवर दिले आहेत. याशिवाय पिकांची नासाडी करणाऱ्या मोकाट जनावरांमुळे  शेतकरी हैराण झाले आहेत. अनेकवेळा तक्रारी करूनही हिम्मतपूर येथील रेशन धान्य विक्रेत्यावर कोणतीही कारवाई होत नाही. या सर्व प्रश्नांची सोडवणूक त्वरीत होणे गरजेचे आहे.
वीज विभाग भरमसाठ वीजबिले पाठवून ती नंतर दुरुस्त करण्याच्या नावाखाली बिनदिक्कतपणे सुविधा शुल्क वसूल करीत आहे. यावरही कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी कुंवर खुशनुद आरिफ अली, राजेश चौधरी, पीके वर्मा, श्याम सुंदर त्यागी, अमजद खान यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here