कोल्हापूर : लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याची ( हमिदवाडा-कौलगे, ता. कागल) २०२२-२३ सालाची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी, दि. १६/०९/२०२३ रोजी दुपारी १.०० वाजता कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आली आहे.
या सभेत, १) मागील वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २४.०९.२०२२ चा वृत्तांत वाचून कायम करणे. २. सन २०२२-२३ या वर्षाचा संस्थेच्या कामकाजाचा वार्षिक अहवाल २) नफा-तोटा पत्रक, ताळेबंद दाखल करून घेणे व तो स्वीकारणे ३) वैधानिक लेखापरीक्षक यांच्याकडून आलेल्या २०२२-२३ या वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे व मागील लेखापरीक्षणाचा दोष दुरुस्ती अहवाल स्वीकारणे ४) २०२३-२४ सालाकरिता संचालक मंडळाने सादर केलेल्या संस्थेच्या अंदाजपत्रकाची व निधी उभारणीसाठी सुचविलेल्या उपाययोजनांची नोंद घेणे तसेच २०२२-२३ वर्षातील अंदाजपत्रकापेक्षा कमी-जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे ५) २०२२-२३ मध्ये संचालक मंडळाने भागविकास निधीच्या केलेल्या विनियोगाची नोंद घेऊन मंजुरी देणे तसेच पुढील वर्षासाठी भाग विकास निधी उभारणेबाबत संचालक मंडळाने केलेल्या शिफारशीवर विचार करणे. ६)२०२३-२४ या वर्षाकरिता शासनमान्य लेखापरीक्षकांच्या नामतालिकेमधून वैधानिक लेखापरिक्षकांची नेमणूक करणे व त्यांचे लेखापरीक्षण शुल्क ठरविणे. ७) अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
सभेस कोरम न झालेस सभा एक तास पुढे ढकलणेत येईल आणि अशावेळी कोरम पूर्ण नसेल तरी सभेचे कामकाज पार पाडले जाईल, असे कळविण्यात आले आहे. तरी या सभेस कारखाना सभासदांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष, खासदार संजय मंडलिक आणि कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील यांनी केले आहे.