कोल्हापूर : केंद्र आणि राज्य सरकारकडून साखर कारखानदारीला बळकटी देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. साखरेला चांगला दर मिळण्यासाठी देशातील अतिरिक्त साखरेच्या निर्यातीचे धोरण लवकर जाहीर करावे, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही हमिदवाडा साखर कारखान्याचे अध्यक्ष, खा. संजय मंडलिक यांनी दिली.
हमिदवाडा (ता. कागल) येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याच्या २७ व्या सर्वसाधारण वार्षिक सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. आगामी गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी शेतकरी, सभासदांनी जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी पाठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी संचालक सत्यजित पाटील यांनी प्रास्ताविक केले.विषय वाचन कार्यकारी संचालक एन. वाय पाटील यांनी केले. यावेळी अतुल जोशी, संचालक वीरेंद्र मंडलिक, ॲड. रेखा भोसले यांनी मनोगत व्यक्तएम साखरेला आत मागणी इंगळे, आर डी पाटील कुरुकलीकर, राजेखान जमादार, केराव पाटील, बाजीराव गोधड़े यासह कारखान्याचे सर्व संचालक, सभासद उपस्थित होते.