‘दत्त’च्या सहवीज प्रकल्पास ‘को-जन इंडिया’तर्फे पुरस्कार

पुणे : साखर कारखानदारीतील सहवीज निर्मिती प्रकल्पाकरिता देशपातळीवर को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्यावतीने श्री दत्त शिरोळच्या सहवीज निर्मिती प्रकल्पास देश पातळीवरील उत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमात मल्लिकार्जुन राजमाने, योगेश हुलगिरे, शेख शहावली बेपारी यांना उत्कृष्ट व्यवस्थापक म्हणून गौरव झाला. पवार यांच्या हस्ते ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी एम. व्ही. पाटील, अरुणकुमार देसाई आदी उपस्थित होते.

कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील म्हणाले, श्री दत्त सहकारी साखर कारखान्यास सहवीज निर्मिती प्रकल्पास देशपातळीवरील सहकार क्षेत्रांतर्गत उत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प म्हणून गौरविण्यात आल्याची बाब अभिमानास्पद असल्याचे ते म्हणाले. यावेळी साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, ‘एनएसआय’चे नरेंद्र मोहन, सुभाष कुमार, देसाई, दिनेश जगदाळे, विनया घोरपडे, संगीता पाटील, रणजीत कदम, महेंद्र बागे, कार्यकारी संचालक एम.व्ही. पाटील, सचिव अशोक शिंदे, संजय भोसले, विजयकुमार इंगळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here