आंबेडकर नगर : उत्तर प्रदेशमध्ये नव्या गाळप हंगामाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. अकबरपूर येथील सहकारी ऊस समितीच्या प्रांगणात जिल्हास्तरीय ऊस सर्वेक्षण, तोडणी पावती प्रात्यक्षिक व शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा पंचायत अध्यक्ष श्याम सुंदर वर्मा उर्फ साधू यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
यावेळी श्याम सुंदर वर्मा उर्फ साधू यांनी सर्व ऊस पर्यवेक्षकांच्या स्टॉलवर सर्व्हेसंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेऊन तक्रारींचा त्वरीत निपटारा करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा ऊस अधिकारी डॉ. हरी कृष्ण गुप्ता यांनी ऊस पर्यवेक्षकांच्या स्टॉलचीही पाहणी केली. त्यांनी पर्यवेक्षकांना मंडलाशी संबंधित तक्रारी रजिस्टरमध्ये नोंदवून त्या तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले.
शेतकऱ्यांना नवीन सभासद करून ३० सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करून घेण्याच्या सूचना जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी दिल्या. मेळाव्यात सचिव अजयकुमार सिंग, अतिरिक्त महाव्यवस्थापक रवींद्र सिंग, ऊस विकास निरीक्षक रवींद्र नाथ सिंग, ऊस पर्यवेक्षक व शेतकरी उपस्थित होते. मेळ्यात ११५ शेतकऱ्यांनी त्यांच्या सर्वेक्षणाची पाहणी केली. सर्व्हे आणि तोडणी पावती पडताळणी मेळावा २५ सप्टेंबरपर्यंत दररोज सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत सुरू राहाणार आहे.