सांगली : क्रांती कारखान्याला देशातील सर्वोत्कृष्ट सहवीज निर्मितीचा देशातील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार खा. शरद पवार यांच्या हस्ते क्राति अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड आणि त्यांच्या शिष्टमंडळाने स्वीकारला. को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाकडून देश पातळीवर सहवीज निर्मिती करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार दिला जातो.
या पुरस्कारासाठी क्रांती कारखान्याने मागील तीन वर्षात पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती केली आहे. वाफेचा कार्यक्षम वापर केला आहे व जास्तीत जास्त वीज निर्यात केली. कारखान्याने स्वतःसाठी कमीतकमी विजेचा वापर केला, बीज निर्मितीसाठी पाण्याची बचत करुन त्याचा पुनर्वापर आदी निकषांच्या आधारे हा पुरस्कार देण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे, दिलीप थोरबोले, वैभव पवार, संग्राम जाधव, सुभाष बढेर, जितेंद्र पाटील, सुकुमार पाटील, अशोक विभूते यांनी हा पुरस्कार स्वीकारला.