बरेली : उसावर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. पंतनगर कृषी विद्यापीठाच्या कृषी शास्त्रज्ञांनी धामपूर बायो ऑरगॅनिक्स ग्रुप आणि मीरगंज साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने रोगग्रस्त ऊस असलेल्या गावांना भेटी देऊन पिकाची पाहणी केली. शरद ऋतूच्या काळात शेतकऱ्यांनी भातशेतीमध्ये शक्य तितकी आडसाली उसाची लागवड करावी, असे आवाहन शास्त्रज्ञांनी यावेळी केले.
पंतनगर कृषी विद्यापीठाचे वनस्पती रोग तज्ज्ञ डॉ. विश्वनाथ, कीटकशास्त्रज्ञ डॉ. एस. एन. तिवारी आणि ०२३८ या ऊस प्रजातीचे जनक डॉ. बक्षीराम यादव यांनी सलग तीन दिवस लाल सड रोगाने बाधित ५० गावांना भेट देऊन पिकाची पाहणी केली. यावेळी मिरगंज साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील परोरा, हळदी, मसिहाबाद, घेवरा, बहरोली, आयहलादपूर, रुपापूर, आगलखिया, मालपुर आणि भांडसर गावातील ऊस पिकांवर रोगाचा तीव्र प्रादुर्भाव आढळला.
कृषी शास्त्रज्ञांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधून उपाय योजनेबाबत मार्गदर्शन केले. शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना तूर्त ०२३८ या प्राजातीच्या ऊसची लागवड करू नका असे सांगितले. याऐवजी कोएल- ०११८ आणि कोएल- १४२०१ या वाणाची निवड करावी. रोगग्रस्त शेतात ऊस लावू नये असा सल्ला दिला. भात शेतीनंतर मोकळ्या झालेल्या शेतात जास्तीत जास्त उसाची लागवड करण्यास सांगितले. यावेळी साखर कारखान्याचे युनिट हेड संजय श्रीवास्तव, मुख्य महाव्यवस्थापक आझाद सिंग, विजय शुक्ला, अनिल छिल्लर, मोईन अहमद आदी उपस्थित होते.