नांदेड : व्हिपीके उद्योग समूहाचे चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी यांच्या व्हीपीके ऍग्रो फुड प्रॉडक्ट लिमिटेड (प्रयागनगर, सिंधी) या पहिल्या युनिटचे मोळी पूजन संपन्न झाले. या कारखान्याचा हा सातवा गाळप हंगाम आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी लवकर चालू करण्यात आला असून शेतकऱ्यांनी इतरत्र उस न देता आपल्या कारखान्याला ऊस देवून सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी यांनी केले.
मारोतराव कवळे गुरुजी म्हणाले कि, व्हिपीके उद्योग समूह ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी पाठवावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी संचालक गणेशराव पाटील ढोल उमरीकर , कांग्रेस कार्याध्यक्ष लिंगराम पाटील कवळे, संचालक गणेशराव पाटील कवळे, सह असंख्य शेतकरी सभासद व कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.