चंदीगढ : फगवाडा साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ४२ कोटी रुपये थकीत आहेत. हे पैसे तातडीने मिळावेत, अन्यथा २७ सप्टेंबर रोजी फगवाडा येथे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विविध शेतकरी संघटनांनी दिला. भारतीय किसान युनियन (दोआबा), दोआबा किसान युनियन, नवांशहर आणि दोआबा किसान संघर्ष समितीच्या सदस्यांनी याबाबत पत्रकार परिषद घेवून आंदोलनाची भूमिका मांडली.
बीकेयू-दोआबाचे अध्यक्ष मनजीत एस. राय यांच्या नेतृत्वाखाली आयोजित पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यात आल्या. ते म्हणाले की, सरकारने अद्याप शेतांमधील वाळू काढलेली नाही. वाळू काढल्यानंतर करता येणार्या पुढील पिकासाठी माती तयार करण्यासाठी शेतकर्यांना वेळ लागतो. या गोष्टींची दखल घेवून तातडीने कार्यवाही करण्याची गरज आहे. सद्यस्थितीत साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांचे पैसे थकीत असल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे तातडीने पैसे देण्यासाठी सरकारने उपाययोजना करावी.