श्री शंकर कारखान्याची एफआरपीपेक्षा जास्त दर देणार : आमदार मोहिते- पाटील

पंढरपूर : सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर कारखान्याची वार्षिक सर्व साधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील प्रमुख उपस्थित होते. यावेळी श्री शंकर कारखान्याच्यावतीने एफआरपीपेक्षा जास्त दर देण्याची घोषणा चेअरमन, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केली. चेअरमन रणजितसिह मोहिते-पाटील म्हणाले की, कारखाना एफआरपीपेक्षा १३५ रुपये ज्यादा दर देणार आहे. दिवाळीपर्यंत उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

यावेळी कारखान्याच्या साखर प्रकल्पाच्या भांडवली खर्चास मंजुरी घेण्यात आली. कारखान्याचे व्हा. चेअरमन मिलिद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. जनरल मॅनेजर रविराज जगताप यांनी सभेचे विषय वाचन केले. संचालक दत्तात्रय रणवरे यांनी आभार मानले. सभेला सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते- पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, आ. राम सातपुते, शिवामृत दूध संघांचे चेअरमन मोहिते-पाटील, जि प माजी उपाध्यक्ष पांढरे, चेअरमन शंकरराव माने देशमुख, सूतगिरणीचे चेअरमन आप्पा काळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर स्वरुप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजित डुबल उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here