देसाई कारखान्याने इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर दिला : पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने १२५० मेट्रिक टन कार्यक्षमता असतानाही जिल्ह्यातील इतर काखान्यांच्या बरोबरीने दर दिला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. दौलतनगर (ता. पाटण) येथे लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याच्या वार्षिक सभेत ते बोलत होते. कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, आदित्यराज देसाई, जयराज देसाई, डॉ. दिलीपराव चव्हाण, अशोकराव पाटील, पांडुरंग नलवडे, शशिकांत कदम, सोमनाथ खामकर, प्रशांत पाटील आदींची उपस्थिती होती.

यावेळी मंत्री देसाई म्हणाले, राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या उत्पादन कराबाबतचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती केली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेऊन उत्पादन शुल्काचा प्रश्न सोडवला आहे. सरकारमुळे राज्यातील कारखान्यांचे साडेसात हजार कोटी माफ झाले आहेत. यात देसाई कारखान्याचे ५५ कोटी रुपयांचा समावेश आहे.

चेअरमन यशराज देसाई म्हणाले की, सर्व शेतकरी सभासद व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या गाळप क्षमतेचा विस्तार १२५० मेट्रिक टनापासून तीन हजार मेट्रिक टन करण्यात आला आहे. ते म्हणाले, उर्वरीत एफआरपी लवकरच शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा केली जाईल. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणी कामगार टंचाईवर मात करण्यासाठी हार्वेस्टरमार्फत ऊसतोडणीसाठी प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. अशोकराव पाटील यांनी प्रास्तविक केले. कार्यकारी संचालक सुहास देसाई यांनी सूचना वाचन केले. वैभव जाधव यांनी अहवाल वाचन केले. बबनराव शिंदे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here