गुजरातमध्ये काळ्या उसाच्या लागवडीने बदलले शेतकऱ्याचे आयुष्य

अमरेली : जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील एका शेतकऱ्याने काळ्या उसाची लागवड केली आहे. या उसाची लागवड सेंद्रिय पद्धतीने केली असून या उसाने शेतकऱ्याला करोडपती बनवले आहे. कमी खर्चात अधिक नफा मिळाला आहे.न्यूज१८ ने दिलेल्या वृत्तानुसार, ऊस पिकाला जास्त पाणी लागते. त्यामुळे पाण्याची सोय असलेल्या भागातच ऊस पिकवला जातो. अमरेली जिल्ह्यात उसाचे पीक सर्रास घेतले जात नाही. मात्र, सावरकुंडला तालुक्यातील जेजड गावातील शेतकरी हरेशभाई डेगरा यांनी सेंद्रिय शेती केली आहे. ते जीवामृत, बीजामृत, धनमृतचा शेतीमध्ये वापर करतात. हरेशभाई यांनी गेल्यावर्षी ऊस पिकातून १६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले.

पेरणी ते काढणीपर्यंत त्यांना सुमारे सहा ते सात लाख रुपये खर्च आला. पन्नास टक्के नफा मिळाला. आपल्याला २० किलो उसासाठी २५० ते ३५० रुपये दर मिळाला असे ते सांगतात. हरेशभाई यांनी सांगितले की, सेंद्रिय शेतीमुळे उसामध्ये किड पडत नाही. यंदा 12 बिघा जमिनीत काळ्या उसाची लागवड करण्यात आली आहे. उसातून ३२ लाख रुपये भाव मिळेल असा अंदाज आहे. हा ऊस खाण्यासाठी वापरला जातो असल्याचे त्यांनी सांगितले. या उसामध्ये कोल्हापुरी काळा, मद्रासी काळा, पांढरा जामनगरी उसाचा समावेश आहे. शेतकरी उत्पादन वाढीसाठी सेंद्रिय शेती आणि खतांचाही वापर करतात. उसाची पाने जमिनीत गाडल्याने उत्पादनात वाढ होते. मी जिल्ह्यात प्रथमच हा प्रयत्न केला आहे. चांगले उत्पादनदेखील मिळाले आहे. ऊस तोडणी, औषधे व खतांचा वापर करण्यात अडचणी आल्या असे डेगरा यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here