कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखान्याचा कारभार पारदर्शक असून कारखान्याने इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर दिला आहे, असे प्रतिपादन भोगावतीचे अध्यक्ष, आमदार पी. एन. पाटील यांनी केले. साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर करवीर व राधानगरी तालुक्यांतील कार्यकर्त्यांच्या देवाळे येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाबूराव चव्हाण होते.
आ. पी. एन. पाटील म्हणाले की, कारखान्याच्या मालकीच्या डिस्टिलरीचा आम्ही १३७ कोटींचा दंड माफ करून घेतला आहे. सहा वर्षांपूर्वी साखर कारखाना आर्थिक अडचणीत होता. मात्र आम्ही कारखान्याला वाचवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले. कारखाना काँग्रेसच्या ताब्यात आल्यानंतर इतर साखर कारखान्यांच्या बरोबर दर दिला आहे.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, पी. डी. धुंदरे, शिवाजीराव पाटील यांची यावेळी भाषणे झाली. बाबासाहेब पाटील, आनंदराव मगदूम, सुरेश कुसाळे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केली. कृष्णराव किरुळकर, एम. आर. पाटील, शिवाजीराव तळेकर, संदीप पाटील, सुशील पाटील आदींसह सभासद यावेळी उपस्थित होते. विश्वनाथ पाटील यांनी आभार मानले.