भारती शुगर्सचा रोलर पुजन समारंभ उत्साहात

सांगली : भारती शुगर्स अ‍ॅण्ड फ्युअल्स प्रा. लि. नागेवाडी चे गळीत हंगाम २०२३-२४ चा मिल रोलर पुजन एस.एफ कदम (कार्यकारी संचालक, सोनहिरा सह.साखर कारखाना) यांचे शुभहस्ते व सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे संचालक महेंद्र (आप्पा) लाड, भारती शुगर्स अ‍ॅण्ड फ्युअल्स प्रा. लि.चे चेअरमन ऋषिकेश दादा लाड यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

मुख्य कार्यकारी अधिकारी आर.डी.पाटील यांनी स्वागत केले. यावेळी महेंद्र (आप्पा) लाड म्हणाले की, गळीत हंगामासाठी कारखान्याकडे ८०५० हेक्टरची नोंद झाली आहे. नोंदीतील ऊस तोडणी वाहतुकीचे नियोजन पुर्ण झाले आहे. या वर्षीचा गळीत हंगाम पुर्ण क्षमतेने चालवणार असून त्या दुष्टीने सर्व कामे प्रगतीपथावर आहेत. शेतक-यांच्या ऊसाला योग्य तो भाव देण्याचे काम व्यवस्थापनाच्या वतीने केले जाईल. कार्यक्षेत्रातील नोंदीतील सर्व ऊस गाळपासाठी वेळेत आणला जाईल. शेतक-यांनी कोणतीही घाई न करता भारती शुगर्ससाठी ऊस ठेवावा, असे आवाहन महेंद्र आप्पा लाड यांनी केले.

या कार्यक्रमासाठी श्रीपती शुगर्स लि. डफळापुर चे सर्व खाते प्रमुख, राजेंद्रभाऊ लाड, शंकरनाना मोहिते (हिंगणगादे), रामभाऊ देवकर (बनपुरी), आकश साळुंखे (सरपंच कान्हरवाडी) अजितकुमार मोहिते (सरपंच हिंगणगादे) चंद्रकांत चव्हाण, (सरपंच तांदळवाडी), सयाजी धनवडे, (संचालक सोनहिरा),अनिल सुर्यवंशी (सरपंच खेराडे वांगी), सोपान माने (सरपंच आंबेगांव) सतिश जगताप (उपसरपंच वडियेरायबाग,) शिवाजी गढळे (संचालक सोनहिरा), सुनिल जगताप (सरपंच येवलेवाडी,) भानुदास निकम (चेअरमन वि.का.सो.नागेवाडी,) मोहन बाबर,उत्तम माने, रणजित मोहिते (उपसरपंच तोंडोली ),विलास सुर्यवंशी (संचालक सो.वाझर), खंडेराव आनंदा जाधव (माजी उपसरपंच आळसंद ) हे प्रमुख पाहुणे व कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी भारती शुगर्सचे वर्क्स मॅनेजर प्रकाश तुपे,मुख्य शेती अधिकारी अतुल नाईकनवरे, फायनान्स मॅनेजर आनंद मोहोळकर,चिफ केमिस्ट विकास सूर्यवंशी,उपखाते प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here