आठ प्रमुख उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात ऑगस्ट 2022 च्या तुलनेत ऑगस्ट 2023 मध्ये 12.1% (तात्पुरती) वाढ

आठ प्रमुख उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात ऑगस्ट 2022 च्या तुलनेत ऑगस्ट 2023 मध्ये 12.1 टक्क्यांनी (तात्पुरती) वाढ झाली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये गेल्या वर्षीच्या याचा महिन्याच्या तुलनेत (सिमेंट, कोळसा, कच्चे तेल, वीज, खते, नैसर्गिक वायू, पेट्रोलियम शुद्धीकरण उत्पादने आणि पोलाद) यांच्या उत्पादनात विक्रमी सकारात्मक वाढ झाली आहे. वार्षिक आणि मासिक निर्देशांक तसेच वृद्धीदराचा तपशील अनुक्रमे परिशिष्ट I आणि II मध्ये देण्यात आला आहे.

2. आयसीआय अर्थात आठ प्रमुख उद्योगांचा निर्देशांक सिमेंट, कोळसा, कच्चे तेल, वीज, खते, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने आणि पोलाद या आठ प्रमुख उद्योगांच्या उत्पादनाच्या एकत्रित आणि वैयक्तिक कामगिरीचे मोजमाप आहे.

3. मे 2023 साठी आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकाचा वाढीचा अंतिम दर 5.2 टक्के इतका सुधारित करण्यात आला आहे. एप्रिल ते ऑगस्ट, 2023-24 या कालावधीत आठ प्रमुख उद्योगांचा एकत्रित वाढीचा दर गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 7.7 टक्के (तात्पुरता) आहे.

4. आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकाचा सारांश खाली दिला आहे:

सिमेंट – ऑगस्ट 2022 च्या तुलनेत ऑगस्ट 2023 मध्ये सिमेंट उत्पादन 18.9 टक्क्यांनी वाढले.

कोळसा – ऑगस्ट 2022 च्या तुलनेत ऑगस्ट 2023 मध्ये कोळसा उत्पादन 17.9 टक्क्यांनी वाढले.

कच्चे तेल – ऑगस्ट 2022 च्या तुलनेत ऑगस्ट 2023 मध्ये कच्च्या तेलाचे उत्पादन 2.1 टक्क्यांनी वाढले.

वीज – ऑगस्ट 2022 च्या तुलनेत ऑगस्ट 2023 मध्ये वीज निर्मिती 14.9 टक्क्यांनी वाढली.

खते – ऑगस्ट 2022 च्या तुलनेत ऑगस्ट 2023 मध्ये खत उत्पादन 1.8 टक्क्यांनी वाढले.

नैसर्गिक वायू – ऑगस्ट 2022 च्या तुलनेत ऑगस्ट 2023 मध्ये नैसर्गिक वायूचे उत्पादन 10.0 टक्क्यांनी वाढले.

पेट्रोलियम शुद्धीकरण उत्पादने – ऑगस्ट 2022 च्या तुलनेत ऑगस्ट 2023 मध्ये पेट्रोलियम शुद्धीकरण उत्पादनात 9.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पोलाद – ऑगस्ट 2022 च्या तुलनेत ऑगस्ट 2023 मध्ये पोलाद उत्पादनात 10.9 टक्क्यांनी वाढ झाली.

टीप: जून 2023, जुलै 2023 आणि ऑगस्ट 2023 चे माहिती संकलन तात्पुरते आहे. स्त्रोत संस्थांकडून अद्ययावत केलेल्या माहिती संकलनानुसार प्रमुख उद्योगांचे निर्देशांक सुधारित / अंतिम केले जातात.

टीप: एप्रिल 2014 पासून नवीकरणीय वीज निर्मिती स्त्रोतांकडून आलेल्या आकडेवारीचा देखील समावेश करण्यात आला आहे.

टीप: सप्टेंबर, 2023 साठी गुरुवारी 31 ऑक्टोबर, 2023 रोजी निर्देशांक जारी केला जाईल.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here