भाऊराव चव्हाण कारखान्याची शेतकऱ्यांच्या विश्वासावर यशस्वी वाटचाल : आ. अशोक चव्हाण

नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासावर ३० वर्षापासून यशस्वी वाटचाल सुरु आहे. कारखान्याने आतापर्यंत कोणत्याही बँकेचा एकही हप्ता थकवलेला नाही. आत्तापर्यंत शेतकऱ्यांचे हिताचेच निर्णय सभासदांनी घेतले, मात्र काही लोकांना कारखाना चांगला चाललेला पाहवत नाही , अशी टीका माजी मुख्यमंत्री व भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष, आमदार अशोक चव्हाण यांनी केले.

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष गणपतरावजी तिडके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. आ. चव्हाण म्हणाले की, आपला कारखाना इतर कारखान्यापेक्षा जास्तीचा भाव देत आहे. उसाची लागवड कारखान्याच्या नियोजनासार केल्यास शेतात ऊस शिल्लक राहणार नाही. शेतकऱ्यांनी चिंता करू नये. आपला ऊस इतर कारखान्याला देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. काही लोकांना कारखाना चांगला चाललेला पाहवत नाही. अनेक अडचणी आणण्याचा प्रयत्न ते सतत करत असतात. ज्यांना एकही संस्था चालवता येत नाही, त्यांनी कारखान्याबद्दल बोलू नये, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील-नागेलीकर, साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण, माजी सभापती शामराव पाटील-टेकाळे, बाबुराव कोंढेकर, सभापती संजय देशमुख-लहानकर, संचालक अॅड. सुभाषराव कल्याणकर, व्यंकटराव साखरे, शिवाजीराव पवार, प्रा. कैलास दाड, व्यंकटराव कल्याणकर, मोतीराम पाटील- जगताप, लालजी पाटील-कदम, बळवंतराव इंगोले, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, उद्धवराव पवार, जगदीश पाटील आदीसह अनेक ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here