पन्नगेश्वर साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा

लातूर : येथील पन्नगेश्वर साखर कारखान्यातील सुरक्षा विभागातील आणि इलेक्ट्रीशियन वायरमन कर्मचाऱ्यांचे गेल्या पंधरा महिन्यापासूनचा पगार थकला आहे. याबाबत कारखाना प्रशासनाला वारंवार विनंती करूनही अद्याप पगार मिळालेला नाही. थकीत पगार मिळावा आणि भविष्य निर्वाह निधी दि. १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत जमा व्हावा, अन्यथा दि.१६ ऑक्टोबर रोजी कारखान्याच्या गेट समोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी साखर आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदारांसह कारखाना प्रशासनास निवेदनाद्वारे दिला आहे.

स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित आणि बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, या हेतूने पन्नगेश्वर कारखान्याची उभारणी केली. परंतु त्यांच्या पश्चात कारखाना कधी बंद तर कधी चालू अशा परिस्थित आहे. यावर्षीचा गळीत हंगाम सुरु होण्याचीही शक्यता कमीच आहे. जे सुरक्षा विभागात २०२२-२३ गळीत हंगामापासून नियमीत कामावर आहेत. त्यांचा गेल्या पंधरा महिन्यापासून पगार दिलेला नाही. त्यांचा भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) ही जमा केलेला नाही.

याबाबत पन्नगेश्वर साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक डी. जी. बरुळे म्हणाले, कारखान्याची आर्थिक स्थिती चांगली नसून कर्ज देण्याऱ्या बँका कोर्टात गेल्या आहेत. आपल्याकडे कर्मचाऱ्यांचा पगार होईल एवढी साखर शिल्लक आहे. परंतु बँका कोर्टात गेल्याने ती आपणाला विकता येत नाही. निकाल येताच सुरक्षा कर्मचाऱ्यांचा पगार करण्यात येईल.

निवेदनावर एस. पी. केंद्रे, व्हि. एस. मडके, एस. एस. दराडे, एच. एल. हनवते, आर. बी. सावंत, जी. बी. सिरसाट, के. व्हि. सोनवणे, व्हि. एल. कुरे, के. पी. सिरसाट, डि. बी. राठोड, यु. टी. राठोड, ए. बी. आचार्य, केंद्रे बी. डी., एस. डी. केंद्रे, जी. एन. केंद्रे आदींची नावे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here