सातारा : अडचणींवर मात करून अजिंक्यतारा साखर कारखाना स्वयंपूर्ण झाला आहे. साखर कारखान्याची आज जी प्रगती झाली आहे, जी घोडदौड सुरू आहे, ती कारखान्याचे सभासद, शेतकरी आणि कामगारांच्या सहकार्यामुळे आहे,’ असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा स्व. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन येथे झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन यशवंत साळुंखे होते.
यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न साखर कारखान्याच्या माध्यमातून सत्यात उतरले आहे. शेतकऱ्यांचे हित आणि परिसराचा विकास याला कारखाना प्रशासनाने नेहमीच प्राधान्य दिल्याचे त्यांनी सांगितले. सभेला दिलीप फडतरे, सुनील काटे, धनाजी शेडगे, बाळकृष्ण फडतरे, रवींद्र कदम, चंद्रकांत जाधव, सतीश चव्हाण, वनिता गोरे, सुरेश सावंत, कांचन साळुंखे, दादा शेळके, अरविंद चव्हाण, राहुल शिंदे, उत्तमराव नावडकर, सरिता इंदलकर, मिलिंद कदम, धर्मराज घोरपडे आदी प्रमुख उपस्थिती होती.