महाराष्ट्रातील २७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला

पुणे : राज्यातील ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका सोमवार, दि. ९ सप्टेंबरपासून सुरू करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी जारी केले. त्यानुसार आता २७ हजार ६४ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांकरिता प्रारूप अथवा अंतिम मतदार याद्या ७ जूनपर्यंत किंवा त्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, अशा संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया त्या-त्या टप्प्यापासून सुरू कराव्यात अशी सूचना प्राधिकरणाचे सचिव वसंत पाटील यांनी दिल्या आहेत.

ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीकरिता ८ जून ते २१ ऑगस्ट या कालावधीत प्रारुप किंवा अंतिम मतदार याद्या प्रसिध्द केल्या आहेत, अशा संस्थांच्या निवडणुकांकरिता एक ऑक्टोबर २०२३ या कट ऑफ डेटवर नव्याने प्रारूप मतदार यादया तयार करण्याची सूचना देण्यात आली आहे. सहकारी संस्थांच्या वर्गवारीनुसार ‘अ’ वर्गातील ४९, ‘ब’ वर्ग १,८१५, ‘क’ वर्ग १२,३०० आणि ‘ड’ वर्गातील १२,९०० संस्थांचा समावेश आहे. प्रलंबित सहकारी संस्थांच्या निवडणुकांकरिता प्रारूप मतदार याद्या ही तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here