महाराष्ट्र : हवाई ॲम्ब्युलन्स सेवेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रात एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यासाठी हवाई धावपट्टी तयार करणे आणि ही सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (एमएडीसी) नोडल एजन्सी म्हणून काम करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. बुधवारी संचालक मंडळाच्या बैठकीनंतर एमएडीसीच्या अध्यक्षपदी असलेल्या शिंदे यांनी ही घोषणा केली, अशी माहिती जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकातून देण्यात आली आहे.

नवभारतमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, अमरावती जिल्ह्यातील बेलोराजवळ विमान वाहतूक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. टाटा समूहाची ‘विस्तार एअरलाइन्स’ हे केंद्र स्थापन करू शकते. पोलिसांच्या निवासी वसाहतीजवळ हवाई पट्टी तयार करण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या.

दरम्यान, लातूर, नांदेड, बारामती, धाराशिव (उस्मानाबाद) आणि यवतमाळ येथील विमानतळांचे काम खासगी कंपनीकडून परत घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here