नवी दिल्ली : जीएसटी कौन्सिलने मोलॅसिसवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. परिषदेने पिण्यायोग्य अल्कोहोलला करातून सूट दिली आहे.५२ व्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेने शनिवारी बाजरीच्या पिठापासून बनवलेल्या खाद्यपदार्थावरील करात ५ टक्के कपात करण्यासह अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.
एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल (ENA) बाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, जीएसटी कौन्सिलने आज ENA कर लावण्याचा अधिकार राज्यांना दिला आहे. त्या म्हणाल्या, जर राज्यांना कर लावायचा असेल तर त्यांना तसे करण्याचा अधिकार आहे. जर राज्यांना कर माफ करायचा असेल तर त्यांनी त्याबाबत निर्णय घेण्याचे स्वागत आहे. जीएसटी कौन्सिल हा कर लावण्याचा निर्णय घेत नाही.