खांडसरी, गुऱ्हाळघरांकडून उसाला प्रति टन ३,००० रुपयांची पहिली उचल

कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्चिम भागात गुऱ्हाळधारक, खांडसरी साखर कारखान्यांनी ३,००० रुपये पहिली उचल जाहीर करत ऊसतोडणी सुरू केली आहे. साखर कारखान्यांच्या दराप्रमाणे उर्वरीत रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली जाईल, असे खांडसरी, गुऱ्हाळघरचालकांकडून सांगण्यात येत आहे. उसासाठी गुऱ्हाळघरे आणि साखर कारखाने यांच्यात साखर हंगाम सुरु होण्याअगोदरच स्पर्धा लागली आहे.

जिल्ह्यात यंदा यावर्षी जिल्ह्यात १ लाख ८८ हजार ४५९ हेक्टर ऊस नोंद आहे. त्यानुसार हंगामात २५ हजार ५७६ हेक्टर आडसाली, ४२ हजार २३६ हेक्टर पूर्व हंगामी तर ३८ हजार ०३१ हेक्टर सुरू आणि ८२ हजार ६१४ हेक्टर खोडवा नोंद आहे. जिल्ह्यामध्ये सरासरी हेक्टरी उत्पादन ७३ मेट्रिक टन होते. यंदा पावसाने दडी मारल्याने हेक्टरी उत्पादन ६५ टनांपर्यंत खाली येईल, असा अंदाज आहे. जिल्ह्यामध्ये अंदाजे १४० ते १६० लाख मेट्रिक टन उसाचे उत्पादन होते. मात्र, यंदा १३६ लाख मेट्रिक टन एवढाच ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे.सध्या पन्हाळा, गगनबावडा आणि करवीर तालुक्यातील काही खांडसरी उद्योगांनी उसाची खरेदी सुरु केली केली आहे. ३,००० रुपये प्रती टन उचल देऊन नंतर साखर कारखान्यांप्रमाणे दर देण्याचे जाहीर केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here