उदयसिंगराव गायकवाड कारखाना साडेसहा लाख मे. टन गाळप करणार : मानसिंगराव गायकवाड

कोल्हापूर : उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात साडेसहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जोरावर हे उद्दिष्ट सहजपणे गाठता येईल. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करावा, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांनी केले. सोनवणे – बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे अथणी शुगर्सचे युनिट असलेल्या कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्यात ते बोलत होते. तोडणी वाहतूक संचालक किसनमामा सोडुलकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

मानसिंगराव गायकवाड म्हणाले, कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप नियोजित वेळे होण्यासाठी योगर नियोजन करण्यात आले आहे. कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. माजी उपाध्यक्ष महादेवराव पाटील, संचालक पंडितराव शेळके, राजाराम चव्हाण, प्रकाश पाटील, बाजीराव लाड, अजित पाटील, गणपती पाटील, कार्यकारी संचालक भगवान पाटील, जगन्नाथ जोशी, अथणी शुगर्सचे युनिट हेड रवींद्र देशमुख, इस्माईल मुलाणी, प्रल्हाद पाटील, डिस्टलरी हेड स्वप्निल देसाई, सुजय पाटील, नितीन सुतार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here