मुंबई : महाराष्ट्राचा ऊस गळीत हंगाम 2023-24 सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी बुधवारी होणारी मंत्री समितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा एकदा तहकूब करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अनुपस्थितीमुळे ही सभा दुसऱ्यांदा तहकूब करण्यात आली. मंत्री समितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होते. या बैठकीला सहकार, कृषी आणि वित्त मंत्री तसेच सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित असतात.
मुळात ही बैठक मंगळवारी (17 ऑक्टोबर) होणार होती, ती बुधवारपर्यंत (18 ऑक्टोबर) पुढे ढकलण्यात आली होती. आता ही बैठक आज (19 ऑक्टोबर) दुपारी 1 वाजता होणार आहे. साखर आयुक्त कार्यालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या बैठका शेवटच्या क्षणी रद्द होत आहेत. बतीह्का अचानक रद्द होणार असल्याने बहुतांश अधिकारी मुंबईत अडकून पडले आहेत. ते म्हणाले, बैठकीच्या काही मिनिटांपूर्वीच आम्हाला बैठक रद्द झाल्याचे सांगण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासारखे दिग्गज नेते साखर क्षेत्राशी संबधित असतानाही बैठका रद्द होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.