केंद्र सरकारची शेतकऱ्यांना दिवाळी भेट, सहा रब्बी पिकांची ‘एमएसपी वाढली

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहा रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भेट दिल्याचे मानले जात आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले कि, गव्हाची एमएसपी १५० रुपये, जवसची एमएसपी ११५ रुपये, हरभऱ्याची एमएसपी १०५ रुपये प्रती क्विंटल आणि करडईची एमएसपी १५० रुपये प्रती क्विंटलने वाढवण्यात आली आहे.

ते म्हणाले, केंद्र सरकारने मोहरीची एमएसपी प्रती क्विंटल २०० रुपयांनी वाढवली आहे. मसूरच्या एमएसपीमध्ये ४२५ रुपये प्रती क्विंटल वाढ करण्यात आली आहे. कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशींच्या आधारे ही वाढ करण्यात आली आहे. या पिकांच्या आंतर राज्य वितरण व्यवस्था उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला. दरम्यान, २०१४ पासून या पिकांच्या एमएसपीमध्ये लक्षणीय प्रमाणात वाढ झाल्याचा दावाही केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला. एमएसपी ही काही कृषी उत्पादनांसाठी सरकारने निर्धारित केलेली किमान किंमत आहे. याच्या आधारे सरकार शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी करते. एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या पिकाला खुल्या बाजारात योग्य भाव मिळत नसेल आणि त्याला पीक विकायचे असेल, तर सरकार त्या शेतकऱ्याकडून ‘एमएसपी’द्वारे पिकाची खरेदी करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here