ऑक्टोबर महिना संपत आला असून आता फक्त १० दिवस उरले आहेत. या काळात तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर मग ही बातमी महत्वाची आहे. देशात सणासुदीला सुरुवात झाली असून त्यामुळे महिन्याच्या या उरलेल्या दिवसांमध्ये बंपर सुट्ट्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडील यादीनुसार, या दहा दिवसांपैकी ९ दिवस बँका बंद राहतील. त्यामुळे, बँकेत जाण्यासाठी घर सोडण्यापूर्वी एकदा बँक हॉलिडे लिस्ट तपासणे गरजेचे आहे.
आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सणांव्यतिरिक्त, ऑक्टोबरच्या १० दिवसांत येणाऱ्या बँकिंग सुट्ट्यांमध्ये साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश होतो. २२ ऑक्टोबर, २८ ऑक्टोबर आणि २९ ऑक्टोबरला रविवार आणि चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील. तुम्ही आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर (https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx) क्लिक करून तुमच्या मोबाईल किंवा संगणकाद्वारे आरबीआयने जारी केलेली यादी पाहू शकता.
२३ ऑक्टोबरला, सोमवारी विजयादशमीची सुट्टी आहे. ही सुट्टी आगरतळा, बेंगळुरु, भुवनेश्वर, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, कानपूर, कोच्ची, कोहिमा, कोलकाता, लखनौ, पाटणा, रांची, शिलांग, तिरुवनंतपुरममध्ये लागू असेल. २४ रोजीची दसऱ्याची सुट्टी हैदराबाद आणि इंफाळ वगळता देशभर लागू आहे. २५ रोजी गंगटोक, २६ रोजी गंगटोक, जम्मू, श्रीनगर आणि २७ ऑक्टोबर रोजी दुर्गापूजनासाठी गंगटोकला सुट्टी असेल. ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभ भाई पटेल जन्मदिनी अहमदाबादमध्ये बँका बंद राहतील. या काळात ऑनलाइन बँकिंग सुविधा उपलब्ध असेल.