बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर अजित पवार यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे. मंगळवारी (दि. २४) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
गळीत हंगाम प्रारंभ कार्यक्रमाला पुरंदरचे आमदार संजय जगताप, ‘वाई-खंडाळा’चे आमदार मकरंद पाटील, ‘फलटण’चे आमदार दीपक चव्हाण उपस्थित राहणार आहेत. यंदा सोमेश्वर कारखान्याने ३३५० रुपये प्रती टन असा उच्चांकी दर दिला आहे. आता येत्या हंगामात एकरकमी एफआरपी देण्याबाबतही त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. सध्या पंधरा कोटी ठेव विमोचन निधीची कपात, साखर वाटप आदी विषयांवरील पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.