नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत सोन्याची चमक दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर आता इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरातील गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यामध्ये गुंतवणुकीला पसंती देऊ लागले आहेत. त्याचा परिणाम म्हणूनच सोन्याची झळाळी वाढू लागली आहे. ऑस्ट्रेलिया, जपान, चीन आणि तैवानमध्ये सोन्याच्या किमती आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहचल्या आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये सोन्याच्या किमतीने आत्तापर्यंतची सर्वोच्च पातळी म्हणजेच $3,159 प्रति औंस गाठली आहे. गेल्या आठवडाभरात सोन्याच्या दरात तब्बल २.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ऑस्ट्रेलियातील सोने AUD 3159 प्रति औंस या सर्वकालीन उच्चांकावर आहे. जपानी येनमधील सोने JPY296,735 प्रति औंस या सार्वकालिक उच्चांकावर आहे. चीनमध्ये सोन्याने CNY14488.70 प्रति औंस असा विक्रमी उच्चांक गाठला आहे. तैवानमधील सोन्याने विक्रमी उच्चांक गाठला आणि सोन्याच्या किमती 5 महिन्यांच्या उच्चांकावर आहेत. ऑस्ट्रेलिया हा जगातील तिसरा सर्वात मोठा सोने उत्पादक देश आहे. ऑगस्ट 2020 मध्ये, सोन्याने USD मध्ये $2072 चा सर्वकालीन उच्चांक गाठला होता. भारतातील सोन्याचा दर मे महिन्यात सर्वोच्च 61,490 रुपयांवर पोहोचला होता.