श्री विठ्ठल कारखाना प्रति टन २५५० रुपये पहिली उचल देणार : चेअरमन अभिजीत पाटील

सोलापूर : यंदा दुसरा गळीत हंगाम यशस्वीपणे सुरू करणारा विठ्ठल साखर कारखाना गळीतास येणाऱ्या उसाला २५५० रुपये प्रती टन पहिली उचल देणार आहे अशी घोषणा कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केली. कारखान्याचा ४२ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ मंगळवारी, विजयादशमीच्या मुहूर्तावर मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत व शोभाताई मोरे, राज्य सहकारी बँकेचे माजी सदस्य अविनाश महागांवकर, ‘जकराया शुगर’ चे चेअरमन बिराप्पा जाधव आदींच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी चेअरमन पाटील बोलत होते.

चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले, आमच्या कारखान्यामुळे जिल्ह्यात ऊस दराची स्पर्धा निर्माण झाली. सर्वच कारखान्यांना जास्तीत जास्त दर देणे भाग पडले आहे. यंदाच्या दुसरा गळीत हंगाम आपण यशस्वीपणे चालू करीत आहोत. कारखान्याचा वजन काटा चोख आहे. ऊस तोडणी- वाहतुकीसाठी १ हजार वाहनांची व्यवस्था केली असून जास्तीत जास्त ऊस दर दिला जाईल. मागील हंगामात आलेल्या उसास प्रति टन २४०० रुपये दर दिला आहे.

यावेळी गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून संतोष नेहराव, बिराप्पा जाधव, धनंजय कोताळकर, प्रताप गंगेकर, महादेव धोत्रे, निलेश आंबरे, लखन चौगुले, प्रथमेश पाटील, चंद्रशेखर कोंडूभैरी, सुधीर धुमाळ, नागेश गंगेकर, अॅड. डी. एस. पाटील, अरुण कोळी, बालाजी मलपे, संतोष पवार, शिवाजी मस्के, ऋषीकेश भालेराव, काका पवार, आदित्य फत्तेपूरकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here