‘घायाळ शुगर’च्या वजनकाट्यामध्ये तफावत आढळल्यास एक लाखाचे बक्षीस : सचिन घायाळ

छत्रपती संभाजीमहाराज नगर : ‘घायाळ शुगर’च्या वजनकाट्यामध्ये तफावत आढळली, तर रोख एक लाखाचे बक्षीस जागेवर देण्यात येईल, अशी घोषणा चेअरमन घायाळ यांनी केली. श्री संत एकनाथ सचिन घायाळ शुगर पैठण या कारखान्याचा गळीत हंगाम २०२३-२४ चा शुभारंभ, श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तुषार शिसोदे, जेष्ठ संचालक विक्रमकाका घायाळ, सचिन ‘घायाळ शुगर’चे चेअरमन सीए सचिन घायाळ यांच्या हस्ते करण्यात आला.

चेअरमन सचिन घायाळ म्हणाले, १ नोव्हेंबर २०२३ पासून गाळप सुरु होणार असून बारामती ॲग्रो कन्नड, गंगामाई शुगर घोटण, छत्रपती संभाजी शुगर चित्ते पिंपळगांव, मुक्तेश्वर शुगर धामोरी गंगापुर या कारखान्याचा जो उसाचा भाव राहील, त्याच बरोबरीने सचिन घायाळ शुगर ऊसाला भाव देणार आहे. गळीत हंगाम २०२३-२४ करीता ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा ५०० बैलटायर, १६० मिनी ट्रॅक्टर व ८० वाहनटोळी या यंत्रणेला १२ कोटी रुपयांचा अॅडव्हान्स वाटप केलेला असून, पैठण तालुक्यातील प्रत्येक गावात ऊस तोडणी यंत्रणा कार्यान्वित राहील. सचिन घायाळ शुगर कारखान्याचे प्रतिदिन ३००० मे. टन गाळप होणार आहे व गळीत हंगाम २०२३-२४ करीता ३ लाख ५० हजार मे. टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे, असेही घायाळ यांनी सांगितले.

ज्या शेतकऱ्यांना इतर कारखान्यांना आपला ऊस द्यावयाचा असेल त्यांच्यासाठी देखील सचिन घायाळ शुगर पैठण येथील वजन काट्यावर ऊसाचे वजन मोफत करुन देण्यात येईल व त्याची अधिकृत पावतीही (स्लिप) देण्यात येईल. जेणेकरून सचिन घायाळ शुगर वजनकाटा व ईतर कारखाना वजन काटा यातील फरक स्पष्ट दिसून येईल, असे त्यांनी जाहीर करताच उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. याप्रसंगी श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक अक्षय शिसोदे,  प्रल्हाद औटे, दत्तात्रय आम्ले, डिगृतात्या गोर्डे,  आबासाहेब मोरे, रमेश पा. क्षिरसागर, दत्ताभाऊ गोर्डे, अंकुश रंधे, विनोद तांबे, भाऊसाहेब पिसे तसेच कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, सर्व अधिकारी व कर्मचारी कामगार तोडणी वाहतुक कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here