सोलापूर : लोकमंगल साखर कारखान्याने गेल्या २३ वर्षात दिलेला शब्द पाळत आलेला आहे. २०२३-२४ गळीत हंगामात येणाऱ्या उसाला प्रति टन २५०० रुपये दर दिला जाणार आहे. शेतकरी बांधवांनी उसाचे कोठेही वजन करून आपल्याकडे आणावे, त्यात तफावत येणार नाही. ‘लोकमंगल’ ने आजपर्यंत काट्यामध्ये फरक पडू दिला नाही. यापुढेही पडणार नाही, अशी ग्वाही चेअरमन महेश देशमुख यांनी दिली.
उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ येथील लोकमंगल अॅग्रो ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीने आयोजित मोळी पूजन कार्यक्रमात बोलताना महेश देशमुख म्हणाले, निसर्गाच्या लहरीपणामुळे साखर कारखानदारीसमोर खूप मोठी अडचण निर्माण झालेली आहे. साखर कारखानदारीस उर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी दोन ते तीन हंगाम मोठे होणे गरजेचे आहे. ‘लोकमंगल’च्या वतीने पुढील वर्षी ऊस विकासावर जास्त भर दिले जाणार आहे.
ह.भ.प. सुधाकर इंगळे, ह. भ. प. अनंत इंगळे यांच्या हस्ते मोळी पूजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे संचालक प्रशांत पाटील, ‘बीबीदारफळ’चे तंटामुक्त अध्यक्ष शिवाजी पाटील, दिगंबर ननवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, ह. भ. प. द्वय सुधाकर इंगळे, अनंत इंगळे यांच्या नेतृत्वाखाली अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रदीप काळे, सुनील घालमे, ज्ञानदेव मारकड, प्रदीप काळे, विजय यादव, विवेक पवार, गिरीश कुंभार, तुकाराम यादव, अजय दोबाडा, जीवन कहाते, सुनील यादव, चेतन काळे, विशाल देशमुख, मनीष दापुरकर, साजिद खान, संजय सुतार, ब्रम्हदेव जाधव, राजेंद्र ननवरे, सचिन ननवरे, सुमेर साळुंखे, आबा साठे, भैय्या साठे, हेमंत साठे यांच्यासह सभासद, शेतकरी बांधव उपस्थित