शाहू साखर कारखाना एकरकमी ३,१०० रुपये ऊस दर देणार

कोल्हापूर : कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्यावतीने २०२३-२४ मध्ये गाळपास येणाऱ्या उसाला एकरक्कमी प्रति टन ३,१०० रुपये एफआरपी दिली जाणार आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. घोरपडे म्हणाले की, चालू गळीत हंगामामध्ये गळीतास येणाऱ्या ऊसासाठी ही एफआरपीची रक्कम विनाकपात एक रकमी देण्यात येणार आहे. हंगाम संपल्यानंतर महसूल विभागाच्या तपासणीनुसार जो आर. एफ. एस. दर असेल, तो देण्यास कारखाना कटिबद्ध आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी आपला पिकवलेला सर्व ऊस पाठवून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले. यावेळी कारखान्याचे संचालक युवराज पाटील, बॉबी माने, सचिन मगदूम, सुनील मगदूम, राजू पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here