नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने मंगळवारी यंदाच्या गाळप हंगामात एकूण साखर उत्पादनात 9 टक्क्यांनी घसरण होण्याची शक्यता वर्तवली आहे. ‘इस्मा’ने देशात 337 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज असून हे उत्पादन देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसे असेल, असे म्हटले आहे. देशातील साखर हंगाम ऑक्टोबर ते सप्टेंबरपर्यंत चालतो.
ऑगस्टमध्ये, ISMA ने एकूण साखर उत्पादन 369 लाख टन असल्याचा अंदाज वर्तवला होता, तर इथेनॉलसाठी 41 लाख टन वळवल्यानंतर साखरेचे निव्वळ उत्पादन 328 लाख टन राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.भारताचा देशांतर्गत साखरेचा वापर सरासरी 278.5 लाख टन इतका आहे.ISMA चा मतानुसार, इथेनॉलकडे साखरेच्या वळवण्याचा अंदाज डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या 2023-24 इथेनॉल पुरवठा वर्षासाठी फीड स्टॉक-निहाय इथेनॉल खरेदी किंमत जाहीर केल्यानंतरच लावला जाईल.2023-24 मध्ये देशात उसाचे एकूण एकरी क्षेत्र सुमारे 57 लाख हेक्टर असेल, असे ‘इस्मा’ने म्हटले आहे.