उदगिरी साखर कारखान्याच्या गळीत हंगामास प्रारंभ

सांगली : बामणी (पारे) येथील उदगिरी साखर कारखान्याच्या ११ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ व गाळप क्षमता विस्तारीकरणाचे उद्घाटन आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी आमदार मोहनराव कदम होते. यावेळी आमदार विश्वजित कदम, संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम, अध्यक्ष डॉ. राहुल कदम उपस्थित होते. यावेळी आमदार अनिल बाबर म्हणाले की, सिंचनाकरिता खास बाब म्हणून तातडीने कृष्णा नदीत पाणी सोडावे या मागणीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे तातडीने विशेष बैठकीसाठी प्रयत्न करणार आहे.

यावेळी आमदार डॉ. विश्वजित कदम म्हणाले की, आमदार बाबर यांनी टेंभूचे पाणी वाढीव क्षेत्रासाठी मिळण्याकरिता विशेष प्रयत्न केले आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती पाहता, कोयना धरणातून कृष्णा नदीत पाणी तातडीने सोडणे आवश्यक आहे. आमदारांबरोबर राहून टेंभूचे पाणी शेतीसाठी मिळण्याकरिता प्रयत्न करणार आहे. संचालक उत्तम पाटील यांनी स्वागत केले. प्रल्हाद पाटील यांनी आभार मानले. अशोक साबळे, जे. के. बापू जाधव, रवींद्रअण्णा देशमुख, सुरेश पाटील, जयहिंदशेठ साळुंखे, डी. ए. माने, डॉ. हणमंतराव कदम, विजय कदम, अॅड. सुशांत कदम, निवृत्तीराव जगदाळे, सयाजी धनवडे, आबासाहेब चव्हाण, बाळकृष्ण यादव, दौलतराव यादव, आर. एम. पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here