सातारा : यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२४ सालामधील सुवर्णमहोत्सवी गळीत हंगामाचा प्रारंभ कारखान्याचे चेअरमन, आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते आणि सर्व संचालकांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० वा. वाजता होणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले कि, २०२३-२४ हंगामासाठी कारखान्याकडे २१५७६.२१ हेक्टर ऊसाची नोंद झालेली आहे. संपूर्ण उसाचे गाळप करण्याच्यादृष्टीने तोडणी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. कारखान्यातील दुरुस्तीची कामे पूर्ण झालेली आहेत. कारखान्याचे सभासद, शेतकरी, हितचिंतक यांनी गळीत हंगामाच्या प्रारंभी उपस्थित रहावे, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाच्यावतीने कार्यकारी संचालक पाटील यांनी केले आहे.