आवताडे शुगरकडून पहिला हप्ता २५५१ रुपये : चेअरमन संजय आवताडे

सोलापूर : नंदुर (ता. मंगळवेढा) येथील आवताडे शुगर अँण्ड डिस्टीलरीज प्रा.लि. साखर कारखाना २०२३-२४ गाळप हंगामासाठी पहिला हप्ता प्रति टन २५५१ रुपये देणार असल्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांनी केली. तसेच कामगारांना ८.३३ टक्के बोनस देणार असल्याचेही यावेळी आवताडे यांनी सांगितले.

आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली फॅबटेक समूहातून हा कारखाना खरेदी करून ‘आवताडे शुगर’मध्ये रूपांतरित केल्यानंतर पहिल्या गळीत हंगामामध्ये २३५० रुपये दर दिला आहे. आम्ही हा कारखाना केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला असून या कारखान्यामधून आम्ही कोणताही स्वार्थ ठेवला नसल्याचे चेअरमन संजय आवताडे यांनी सांगितले.

गेल्या गळीत हंगामामध्ये कारखान्याचे सर्व कर्मचारी, ऊस पुरवठादार, ऊस वाहतूकदार, ऊसतोड मजूर व कारखाना प्रशासनाने मन लावून व प्रामाणिक काम केल्यामुळे हंगाम यशस्वीरित्या पार पडला. यावेळीही असेच सहकार्य सर्व कर्मचारी, ऊस पुरवठादार, ऊस उत्पादक वाहतूकदार यांनी केले तर हाही गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडून शेतकऱ्यांचे समाधान होईल, असा जास्तीत जास्त दर शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न असणार आहे असेही चेअरमन संजय आवताडे यांनी सांगितले.

चेअरमन संजय आवताडे यांच्या उपस्थितीत व कारखान्याचे टेक्निकल विभागाचे व्यवस्थापक सुहास शिनगारे व त्यांच्या पत्नी गौरी शिनगारे यांच्या हस्ते होमहवन व सत्यनारायण महापूजा करून डिस्टिलरी विभागाचा द्वितीय बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आला. यावेळी मंगळवेढा मार्केट कमिटीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, कार्यकारी संचालक मोहन पिसे, डिस्टिलरी मॅनेजर संभाजी फाळके, विजय माने, पप्पू काकेकर, शाम पवार, चंदू गोडसे, गोपाळ पवार, श्रीकांत पवार, मोहन पवार, बजरंग जाधव, राहुल नागणे, तौहीद शेख, डॉ. जगताप, रमेश टाकणे आदीसह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here