उसाला प्रति टन ३५०० रुपये दर देण्याची रयत क्रांती संघटनेची मागणी

सोलापूर : यंदा ऊस उत्पादन घटल्याने उसाला प्रतिटन ३५०० रुपये दर द्यावा, अशी मागणी रयतक्रांती संघटनेने उपप्रादेशिक साखर सहसंचालक पांडूरंग साठे यांच्याकडे केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी यंदाच्या गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसाची पहिली उचल कारखान्यांनी जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली. रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले, नामदेव पवार, नवनाथ माने, हनुमंत गिरी, अशोक पवार, प्रफुल्ल कौलगे आदींच्या शिष्टमंडळाने साठे यांची भेट घेतली.

दीपक भोसले म्हणाले की, गेल्या वर्षाची एफआरपी पूर्ण दिल्याशिवाय कारखान्यांना गाळप परवाना देऊ नये, अशी आमची मागणी आहे. अनेक साखर कारखान्यांनी गेल्यावर्षीची एफआरपी अद्याप दिलेली नाही. काही कारखान्यांनी तर पहिली उचल सात ते आठ महिने दिलीच नाही. दरम्यान, पहिली उचल तीन हजार रुपये व अंतिम बिल ३५०० रुपये द्या, सर्व वजनकाटे ऑनलाइन करून ऊस उत्पादकांना न्याय द्या, मागील वर्षी एफआरपी पूर्ण न दिलेल्या कारखान्यांना गाळप परवाना देऊ नका, उसाच्या वाहनांच्या वजनाची काटामारी थांबविण्यासाठी स्वतंत्र पथक नेमा अशा मागण्या रयत क्रांती संघटनेने केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here