कुकडी कारखाना पहिला हप्ता २६०० रुपये देणार : अध्यक्ष, माजी आमदार राहुल जगताप

अहमदनगर : कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पा. कुकडी सह. साखर कारखाना चालू गाळप हंगामात प्रति टन २६०० रुपयांचा भाव देणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल जगताप यांनी जाहीर केले. कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ आणि गव्हाण पूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यावेळी वीररमाता पत्नी सोनाली शिंदे, हसिना शेख, रंजना काळे, शालन कांबळे, नर्मदा गिरमकर, मोहिनी म्हस्के, सुमन वीर, पुष्पा गुंड, शोभा घुटे, सिताबाई तळेकर यांच्या हस्ते २० व्या गाळप हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. बॉयलर अग्निप्रदिपन प्रियंका जगताप, रेखा शिंदे, कमल निंभोरे, पुष्पा घाडगे सुरेखा इथापे, मंगल पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

अध्यक्ष, माजी आमदार राहुल जगताप म्हणाले कि, साखर कारखानदारीत ऊस आणि दराची स्पर्धा वाढत आहे. कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकड़ी सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केले. गेल्या गाळप हंगामातील उसाला प्रति टन २६११ रुपये दर दिल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक कार्यकारी संचालक एस. वाय. महिंद्र यांनी केले. या वेळी उपाध्यक्ष विवेक पवार, डॉ. प्रणोती जगताप जालिंदर निंभोरे, संभाजी देवीकर, बाळासाहेब उगले, विमल मांडगे, नारायण पाटील, पोपटराव ढगे उपस्थित होते. सूत्रसंचलन मोहनराव आढाव यांनी केले. आभार विष्णू जठार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here