नवी दिल्ली : वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि, कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA), वाणिज्य मंत्रालया (भारत सरकार) ने आखाती देशामध्ये कृषी उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी Lulu Hypermarket LLC सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. जागतिक स्तरावर ‘ब्रँड इंडिया’चा प्रचार करण्याच्या उद्देशाने या नवी दिल्ली येथे 3 नोव्हेंबर 2023 रोजी वर्ल्ड इंडिया फूड (WIF) मध्ये APEDA चेअरमन अभिषेक देव आणि LuLu ग्रुपचे अध्यक्ष-सह-व्यवस्थापकीय संचालक युसूफ अली एमए यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
LuLu Group International (LLC) ची इजिप्त, भारत आणि सुदूर पूर्वमध्ये 247 LuLu स्टोअर्स कार्यरत आहेत आणि 24 शॉपिंग मॉल आहेत. LuLu समूह मध्य पूर्व आणि आशियातील सर्वात वेगाने वाढणारी रिटेल चेन आहे. सामंजस्य करारानुसार, लुलू समूह त्यांच्या किरकोळ दुकानांमध्ये APEDA उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीचा सक्रिय प्रचार आणि प्रदर्शन करेल.APEDA ची उत्पादने ठळकपणे प्रदर्शित करण्यासाठी आणि त्यांची दृश्यमानता वाढवण्यासाठी LuLu ग्रुपच्या स्टोअरमध्ये एक समर्पित शेल्फ स्पेस (विशेष विभाग किंवा मार्ग) असणार आहे.
सामंजस्य कराराने असेही नमूद केले आहे की, APEDA आणि LuLu समूह त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्टोअर्स नेटवर्कद्वारे कृषी उत्पादनांची निर्यात सुलभ करण्यासाठी संधी शोधण्यासाठी संयुक्तपणे कार्य करतील. ज्यामुळे भारतीय कृषी उत्पादनाची जागतिक पोहोच आणि ग्राहकांपर्यंत त्यांची सुलभता वाढेल. APEDA आणि LuLu ग्रुप दोन्ही संयुक्तपणे परदेशातील भारतीय मिशन आणि संबंधित भागधारकांच्या सहकार्याने खरेदीदार-विक्रेता मीट (BSM), B2B बैठका, व्यापार मेळावे आणि रोड शो यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करतील.