कोल्हापूर : उसाला दराची घोषणा करण्याअगोदरच हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे उसाची वाहतूक सुरू असल्यामुळे कारदग्याजवळ नरगट्टे वस्तीजवळ मंगळवारी रात्री संतप्त कार्यकर्त्यांनी वाहने अडवून आग लावली. त्यात दोन ट्रॅक्टर जळून खाक झाली आहेत. या घटनेत ट्रॉलीचेही मोठे नुकसान झाले आहे
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कारखाने ऊस दर निश्चित न करताच कर्नाटक व सीमाभागात ऊसतोडणी करीत आहेत. शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत मागील ४०० रुपये व यंदाची पहिली उचल ३५०० रुपये दिल्याशिवाय ऊसतोडणी करू देणार नाही, असा पवित्रा घेऊन महाराष्ट्रात ऊसतोडणी बंद केली आहे. आता या आंदोलनाची झळ सीमाभागात पोहचली आहे.